जा रे जा रे जा रे जा रे जा रे प्रिया.........

शीक ना ऽऽऽ डोळ्यांची भाषा प्रिया....
सांगे ऽऽऽ मौन माझे सख्या.....
शीक ना ऽऽऽ
नाही मी बोलायाची
जाण तू मनाला - ध्रू. -

ऐक ना तू ऽऽऽ काय सांगे ऽऽऽ
सळ सळ सळ हा वारा वाहताना
वाच ना तू ऽऽऽ भालरेषा ऽऽऽ
माथ्यावरी कशिद्याने लिहिताना
चाहुलही बोले स्वतः कसलीशी सांगे कथा
जा रे जा रे जा रे जा रे जा रे प्रिया -१-

डोह जणू ऽऽऽ ऐसा क्षण हा ऽऽऽ
शिवू तू नको थरथरते खोलवरी
थांबलेले ऽऽऽ श्वास जेथे ऽऽऽ
तेथ म्हणे छाया ही काय तरी
सांगाया काही नुरे नयनांनी कथिले पुरे
जा रे जा रे जा रे जा रे जा रे प्रिया -२-

मूळ हिंदी गाणे आणि गायक/गायिका ओळखा पाहू......

मा. प्रशासक, कृपया हे भाषांतर कूटप्रश्न म्हणून प्रकाशित करावे. ध्रुवपद छन्न ठेवले आहे.