पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन
परवा
पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या
पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी
पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी
पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या
पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.
पंत पुण्यात
पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले.
पांढर्या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला.
पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.
पळता पळता पंकज पाण्याच्या
पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण
पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर
पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.
पंतांनी
पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ
पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने
पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.
पंतांना परमेश्वरच पावला!
-( पटकथा - पुष्कर ऊर्फ शंतनु भट)