मोरावळा

  • चांगले रसरशीत, दळदार आवळे १/२ किलो
  • साखर २ वाट्या, २-३ लवंगा, पाणी
४५ मिनिटे
जसे घ्याल तसे

प्रथम आवळे धुवून कोरडे पुसून घ्यावेत. कुकर मध्ये एका घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून ३-४ शिट्टया करून घ्याव्या. (पाण्याचा स्पर्श अजिबात होता कामा नये). गार झाल्यावर आवळे हाताने सोलून सुरीने लहान लहान फोडी करून घ्याव्या.

जाड बुडाच्या पातेलीत दोन वाट्या साखर घ्यावी. तीत अदमासे १ ते सव्वा वाटी पाणी घालून साखर अंमळ विरघळू द्यावी. नंतर पातेले गॅस वर ठेवून घट्ट सर एकतारी पाक करावा. तो थंड होत आल्यावर त्यात आवळ्याच्या फोडी टाकून ढवळावे व २ लवंगा स्वादासाठी घालाव्यात.

गार झाल्या वर स्वच्छ  काचेच्या बाटलीत भरून ठेवावा.
थंडीत रोज सकाळी उठल्यावर चमचाभर मोरावळा खाणे प्रकृतीस पथ्यकर असते!


उकडलेल्या आवळ्यांच्या थोड्या फोडी वगळून लोणचे करण्यास विसरू नये!

स्वतः