कुणी गुंगीत, कुणी धुंधीत... कुणी मस्तीत चालला होता...
हाती कुणाच्या बांगड्या... कुणी पोपट बनला होता...
पदराची, माझ्या, फडफड... कुणी घरीच ओढला होता...
आवाज धडाधड झाले... अनं घाव खोलवर होता....
खाकीवर चढली लाली... खादीवाला गाडीत होता...
मला वाटलं, रडलं कुणी... तो लाल दिव्याचा घाम होता...
कापडं माझी फाडताना... 'शेजारी' हसहसला होता...
'भारतमाता की जय! '... हा कोण घरातील होता...?
दोन दिवस, तीन रात्री... माहितेय तूही जागला होता...
वास्तवात मात्र तेव्हा... उशीर बराच झाला होता...
पोरा! तू स्वप्नांत जेव्हा... मला हिरे-माणकी सजवत होता...
कसं सांगू पोरा तुला?... माझ्यावर बलात्कार झाला होता...
...... माझ्यावर बलात्कार झाला होता...
रडू नकोस बाळा आता... हे बघना, मी रडतेय का?
हसूही नकोस आता मात्र... मग रडू मला आवरेल का?
पैठणी नाही मागत पोरा... अब्रू माझी झाकायला...
होऊ दे पुन्हा बलात्कार... तुला पेटून उठवायला...
.....तुला पेटून उठवायला......!!
..... तुझीच आई.