जाग

जाग
======================

चहू दिशा अंधारताना..
दीप एक लाव तू..
पांघरून तेज छाया..
गा मांगल्य गान तू..

सावल्या चालून येता..
घे उदेची ढाल तू..
टाळ, मृदंग, शंखनाद..
हो रातीची जाग तू..

घनघोर रानी हरवता..
दे ओळखीची साद तू..
हात हात जोडूनी..
घे दिशेचा माग तू..

बधीरल्या पावलांना..
मी आहे सांग तू..
झोपल्या पेंगुळल्या मतिला..
'जाग जाग सांग तू..

सत्य विदीर्ण सांगताना..
रण हकाळी घाल तू..
वट हुकूम वठवण्या..
बोल आग्रही मांड तू..  

अन्याय घटीत बोलता..
बोल राग राग तू..
न्याय जगी मागताना..
सांग आग आग तू

जाग जाग बोल तू..
जाग जाग बोल तू..

======================
स्वाती फडणीस ............ ०३-१२-२००८