दाल बाटी

  • तुर दाळ १/२ वाटी
  • मुग दाळ १/२ वाटी
  • कणिक १ १/२ वाटी
  • बारीक रवा १ वाटी
  • टोमॅटो २
  • आल लसून पेस्ट
  • तळण्यासाठी तेल
३० मिनिटे

णदाल:

दाल बनवण्यासठी नेहमी वरणासाठी शिजवतो तशी दोन्ही दाळी एकत्र करून शिजवून घ्याव्यात. मग ते वरण

टोमॅटो, आल लसून घालुन फोडणी द्यावे. कोथिबिर घालुण सजवावे.

बाटीः

कणिक व रवा एकत्र घट्ट मळून घ्यावा. मळताना त्यात थोडे मीठ व ओवा घालावा. आता याचे लहान गोळे करून घ्यावेत. ओव्हन असेल तर त्यात बेक करता येतील. कुरकुरीत होइ पर्यंत बेक करावेत. पण जर ओव्हन नसेल तर हे गोळे गरम पाण्यात उकडून घ्यावेत. नंतर त्यांचे सुरी ने काप करून तेलात खरपुस तळून घ्यावेत.

खाताना हि बाटी कुस्करून त्यावर दाल घालवी आणि वरून भरपुर तुप टाकवे. राजस्थान मध्ये बाटी तुपात भिजवून ठेवतात. आणि मग त्यावर दाल घेउन खातात.

हा विशेष राजस्थानी पदार्थ आहे. याच्या बरोबर कुरमा हा गोड पदार्थ करतात. मला करायला आणि खायला पण खुप आवडतो म्हणून सगळ्यान साठी देत आहे. कसा वाटला ते नक्की सांगा.

मनोगत वर पहिल्यांदाच लिहित आहे. त्यामुळे काही चुकले असल्यास माफ करावे.