मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ मास मीडिया (बी. एम. एम. ) या पदवी अभ्यासक्रमाच्या मराठीकरणासंदर्भात मराठी अभ्यास केंद्राने एक मोहीम हाती घेतली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मराठी पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्येष्ठ लेखक व पत्रकार श्री. अरुण साधू या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. भेटीची वेळ अजून निश्चित व्हायची आहे. यासंबंधात सविस्तर चर्चा करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने मराठी वृत्तपत्रांचे आजी-माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे संपादक यांची बैठक मुबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे बुधवार, २४ डिसेंबर २००८ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
संपर्क :
दीपक पवार
अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
santhadeep@gmail.com
(९८२०४३७६६५)
राममोहन खानापूरकर
(९८२००४००६६)