प्रशिक्षण आणि केंद्रांचे महत्व!

प्रशिक्षण आणि केंद्रांचे महत्व!
शिक्षण आणि प्रशिक्षण या निरंतर चलणाऱ्या वैयक्तिक / सामाजिक प्रक्रिया आहेत असेच मला वाटते.
या दोन्ही प्रक्रियांमधील एक फरक म्हणजे दोन्ही प्रक्रियांच्या फलनिष्पत्तींसाठी लागणारा कालावधी. शिक्षणाच्या फलनिष्पत्ती चा काळ हा आजिवन आणि जीवनाच्या नंतर सुद्धा दुसऱ्या जीवानंच प्रवेशा पर्यंत असा काहीसा असावा. तर प्रशिक्षणाच्या फलनिष्पत्तीसाठी लागणारा काळ हा अल्पावधी असतो. म्हणजे एखादे कौशल्य, आत्मसात करणे आणि त्याचा उपयोग [ सदुपयोग किंवा दुरुपयोग ] सत्वर करता यावा यासाठी सातत्याने वापर आणि पुनःआवृत्ती ने ते सिद्ध करणे. जेणे करून "लघुत्तम पण निर्णायक, अपेक्षीत परिणाम" हे साध्य ठेवून, साधन आणि कृती चा विशेष आवृत्तीत्मक अभ्यास करणे. शिक्षणामध्ये, विषयाच्या तत्वांचा, संकल्पनांचा, तर्कांचा, कार्यकारण भावाचा, कल्पनाविस्ताराचा, साध्य आणि साधन निवडी मागील तत्वांचा, साध्य प्राप्ततेसाठी उपलब्ध मार्गांच्या निवडींचा असा, ३६० अंशात्मक अभ्यासाचा अंतर्भाव असतो. शिक्षणाने, सर्वद्न्य [ GENERALIST ] तर प्रशिक्षणाने, विशेषद्न्य [SPECIALIST ]तयार होतात.
सारांश म्हणजे प्रशिक्षण हा शिक्षणाचा एक उपसंच आहे. प्रशिक्षित मेंदू हा अशिक्षित आणि अप्रशिक्षीत मेंदूंपेक्षा जास्त आणि गुणात्मक परिणामकारक असतो हे त्रिवार सत्य / तत्व कोणत्याही प्रशिक्षणात आणि प्रशिक्षकात अंतर्भूत असते. याचे उदाहरणच घ्यायचे झाले, तर सर्वत्र प्रशिक्षीत मेंदूच अप्रशिक्षीत मेंदूं वर चांगला किंवा वाईट परिणाम घडवून आणताना दिसतात. याला प्राणिमात्र सुद्धा अपवाद आहेत असे मला जाणवत नाही.
वैद्यकशास्त्र याच तत्वांचा वापर करून विषाणूंच्या सर्वनाशासाठी, प्रतिजैवकांचा वापर करताना दिसते.
तंत्रद्न्य, संशोधक, विश्लेषक हे प्रशिक्षीत द्न्यानाचा वापर करूनच अनेक यंत्रामधले अनेक दोष निवारण करतात.
देशाच्या संरक्षणासाठी तत्पर सैनिक सुद्धा विशेष प्रशिक्षीतच असतात.
देशाचा राज्यकारभार चालवणारे प्रशासकिय अधीकारी सुद्धा प्रशिक्षीतच असतात. यात मुख्यत्वे प्रशासन सेवा, पोलिस सेवा, आणि विदेश सेवेचा अंतर्भाव असतो.
इतकेच काय, आपले शाळे मधले सर, मास्तर, मैडम, बाई सुद्धा विशेष प्रशिक्षीत असतात.
अर्थतद्न्य मंडळी अर्थविषयक कारभाराचा गाडा विशेष प्रशिक्षणा विना हाकूच शकणार नाहित. प्रशिक्षणाचे आणि केंद्रांचे महत्व जाणण्यासाठी, उपरोक्त प्रशिक्षीत व्यक्तिंचे आणि संस्थांचे योगदान लक्षात आले तरी पुरेसे आहे. मग खरा मुद्दा असा कि इतके प्रशिक्षीत आणि शिस्तबद्ध मेंदू ज्या देशात आहेत, त्यांना प्रशिक्षीत विध्वंसक मेंदूंचा समाजातला "दोष" निवारण का करता येवू नये?
तर, मला असे वाटते की याच देशात, उपरोक्त "प्रशिक्षीत सर्वद्न्य आणि विशेषद्न्यांचे समन्वयक, " असे " प्रशिक्षीत राजनितीद्न्य " यांची फार फार, न भूतो न भविष्यती अशी आवश्यकता आहे. आपणाला काय वाटते?