नको बसू रडगाणं गात

इवलसं पाखरू, लहान किती असतं,

ठिपका बनून आकाशात जातं,

अवघ्या आकाशाला छेद देत!

कर्तृत्व आपलं फुलवित नेतं!

माणसा,

तुला आहे बुद्धी, आहेत दोन हात!

नको बसू रडगाण गात!