यशदा
============================
.
.
ती म्हणाली..
मी समर्पित आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांसकट.
इतकी की आता माझी मला ही मी सापडत नाही.
.
ती म्हणाली..
मी सुखात आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांशिवाय.
इतकी की आता दुःख माझ्या आसपास फिरकत नाही.
.
ती म्हणाली..
मी यशदा आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. आणि माझ्या स्वप्नांची.
इतकी की आता अपयश माझ्या नजरेस पडतच नाही.
.
.
============================
स्वाती फडणीस............................ १०-०१-२००९