चंद्र पाहता अंबरही विरघळते खोल निळाईत
मिटून डोळे लपे चांदणे पुनवेच्या राईत
कोण एक अस्वस्थ सदाशिव घुसळे अंदोलात
उरी मात्र एकाक्ष ध्यास मग दिवस असो वा रात्र
भेट अशी दृष्टादृष्टीतच; युगे चालली मागे
झुरणे अन बहरणे अजूनहि तसेच या उभयांत
कुणी न जाणे किती जन्म रचले असतिल परसात
आशेसह मिरवत आहे जगण्याची लामणवात
............ चारवा