स्नेह

स्नेह माझा श्वास आहे,

स्नेह माझा प्राण आहे,

स्नेह माझा सखा आहे,

देव माझा स्नेह आहे!

जीवनाशी सख्य जुळता,

स्नेहता ही लाभे मला!

स्नेहता मज लाभता,

सौख्य सहजी आले घरा!

स्नेह पाझरे बाळ मुखातून!

स्नेह स्रवतसे मातृ-स्तनातून!

स्नेह झिरपतो बंधू-बंधूतून!

स्नेह दरवळे परिवारातून!!

स्नेहासंगे सार्थ जिणे हे

स्नेहावाचूनी व्यर्थची सारे!

स्नेहसागरी मस्तीत विहरता,

शांत मी, तृप्त मी, स्नेहार्द्र मी!