किती खोल हा घाव मुका
स्वर कुंठित झाला गुदमरला
रक्ताविण रंजित ही क्रांती,....
तळ शिखांत घुसळून गेला
अथांग ह्या डोहास वेढला
किनाराही बघ हिरमुसला
कुणी म्हणे चंद्रिकेसवे
ज्वर विझतांना दिसला
कसे करू पाठवू निवेदन
अवचित वारा निजला
जे घडले जडले तिथेच
मेघातच पाउस थिजला
..........चारवा