महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असे बळकट दुर्ग, सुंदर कोरीव लेणी, पुरातन मंदिरे महाराष्ट्रात सर्वत्र आहेत. अनेक अभ्यासक, इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी तसेच पर्यटक ही स्मारके पाहण्यासाठी जात असतात. सह्या्द्रीतील इतिहासकालीन दुर्गांवर भ्रमंतीसाठी जाण्याचा छंद अनेकांनी जोपासला आहे. यापैकी काहीनी दुर्गांसबंधी लेखन करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. दुर्गसाहित्य हा एक लक्षणीय वाङ्मयप्रकार उदयास आला आहे. अशा दुर्ग साहित्यिकांमध्ये कै. गोपाल नीलकंठ दाण्डेकर यांचे स्थान मानाचे व महत्वाचे आहे.
दुर्गसाहित्य लिहिणारे लेखक, दुर्ग साहित्याचे वाचक, दुर्गांवर भ्रमंती करणारे इतिहासप्रेमी, सह्या्द्रीतील डोंगरदऱ्यांत भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, या सर्वांना एकत्र आणण्यासाठी दुर्गसाहित्य सम्मेलन आयोजित करण्याचे ‘गोनीदा’दुर्गप्रेमी मंडळाने ठरविले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील राजमाची या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या इतिहासकालीन दुर्गावर शनिवार दि. १४ व रविवार दि. १५ फेब्रुवारी २००९ रोजी हे आगळे वेगळे साहित्य सम्मेलन भरणार आहे. मा. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या दुर्गसाहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचे मान्य केले आहे.
या दुर्गसाहित्य सम्मेलनाच्या निमित्ताने एक निबंध स्पर्धा आणि एक दुर्ग छायाचित्र स्पर्धाही आयोजित केली आहे.
सम्मेलनात सहभागी होण्यासाठी आगाऊ नांव नोंदणी करावी लागेल. नाव नोंदणसाठी एक नोंदणी पत्र भरून द्यावे व सम्मेलन शुल्क रु. २००/- द्यावे.
सम्मेलनात सहभागी होणाऱ्या सर्वांची जेवणखाणाची व निवासाची व्यवस्था (शनिवार दि. १४ फेब्रुवारीच्या दुपारच्या जेवणापासून रविवार, दि १५ फेब्रुवारीच्या दुपारच्या जेवणापर्यंत) राजमाची येथे करण्यात येईल.
सम्मेलनात सहभागी होण्यासाठी नोंदणी पत्राचे फॉर्मस तसेच निबंध व छायाचित्र स्पर्धांचे नियम व अटी खाली नाव व पत्ता दिलेल्या व्यक्तींकडे उपलब्ध आहेत. सम्मेलनात सहभागी होण्यासाठी पूर्ण भरलेले नाव नोंदणी पत्र व सम्मेलन शुल्क रु. २००/- या व्यक्ती स्वीकारतील. नाव नोंदणीसाठी अंतीम मुदत ०५ फेब्रुवारी २००९ आहे.
राजमाची येथील सोयी, सुविधा विचारात घेऊन, या सम्मेलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित (५०० माणसे) ठेवली जाईल. या मर्यादेपर्यंत नोंदणी पोहोचली कि, नाव नोंदणी थांबविली जाईल. आगावू नांव नोंदणी न करता आयत्यावेळी येणाऱ्या माणसांना सम्मेलनात प्रवेश देणे शक्य होणार नाही.
नांव नोंदणी करिता पत्ते
श्री. विजय देव मानसी, ६८ तुळशीबागवाले कॉलनी पुणे ४११ ००९ फोनः (२०) २४२२ ४६२४ मोबाइलः ९४२२५ १६५३२ |
श्री. मुकुंद गोंधळेकर फ्लॅट नं. २अ /३०१, कैलाश पार्क सोसायटी ८०, नित्यानंद मार्ग, पनवेल ४१० २०६ घरचा फोन ः (२२) २७४६ ९३५१ मोबाइल फोन ः ९२२३५ ७९६८५ ९०११७ ६८३४८ E-mail : दुवा क्र. १ |
|
श्री. प्रसन्ना जोशी लागू बंधू मोतीवाले, सी / ०२, कोहिनूर अपार्टमेंटस न. चिं. केळकर रस्ता, दादर (पश्चिम) मुंबई ४०० ०२८ फोनः (२२) २४३१ ५५९७ |
श्री. पराग लिमये फ्लॅट नं. १०२, रमा गुलाब जोशी निवास (सरदार पटेल हॉल समोर) पार्लेश्वर रस्ता, विले पार्ले (पूर्व) मुंबई ४०० ०५७ मोबाइल फोनः ९९८७५ ६५७३८ |
|
श्री. आत्माराम पाटील पनवेल बुक डेपो १९८, ऑनेस्टी हाउस, डॉ. आंबेडकर मार्ग पनवेल ४१०२०६ फोनः ९३२२६४१९९५ |
श्री. संजय लोकरे शाम स्टुडिओ, ३, श्री मंगल अपार्टमेंटस (जोशी हायस्कूल जवळ), छेडा रस्ता डोंबिवली (पूर्व) फोनः (२५१) २८००९२७ मोबाइल फोनः ९८६९३ ७०९४२ |
|
अडव्होकेट आनंद देशपांडे बी ३४ / ३६, सोलापुर मिल हाउसिंग सोसायटी (सुपर मार्केट जवळ) ९१, मुरारजी पेठ, सोलापुर फोनः ९८२३२९१६४३ |
श्री. अभय देशमूख वेदांत मेडिकल्स (न्यू इंग्लिश स्कूल जवळ) शनिवार पेठ, सातारा ४१५००२ फोनः (२१ ६२) २२६१४९ |
या दुर्ग साहित्य सम्मेलनासंबंधी अधिक माहिती, तसेच निबंध व छायाचित्र स्पर्धांचे नियम व अटी यासाठी संपर्क
डॉ. विजय देव मानसी, ६८ तुळशीबागवाले कॉलनी पुणे ४११ ००९ घरचा फोनः (२०) २४२२ ४६२४ मोबाइलः ९४२२५ १६५३२ E-mail : दुवा क्र. २ |
श्री. मुकुंद गोंधळेकर फ्लॅट नं. २अ /३०१, कैलाश पार्क सोसायटी ८०, नित्यानंद मार्ग, पनवेल ४१० २०६ घरचा फोनः (२२) २७४६ ९३५१ मोबाइल फोनः ९२२३५ ७९६८५ ९०११७ ६८३४८ E-mail : दुवा क्र. ३ |
(मुकुंद गोंधळेकर)
‘गोनीदा’ दुर्गप्रेमी मंडळा करिता