येते आता

येते आता, येते आता
उद्या परत येईन, येते आता
लचकत आणिक मुरडत मी
उद्या परत येईन, येते आता) *२               
येते आता
येते आता ।ध्रु।

        

(सोड तू माझ्या बाहुंना
अडवु नको मला जाताना) *२
इतकीही व्याकुळता का
समजाव अपुल्या डोळ्यांना                    ॥१॥

(खट्याळ, चंचल ऋतूंमध्ये
रसवर्षी देखाव्यामध्ये) *२
विसरू तुला ना शकेन मी
होईल मीलन बागेमध्ये                       ॥२॥

(रोज होतिल गाठीभेटी
दिन अपुले, अपुल्या राती) *२
अडवेल कोण मग आपल्याला
कर मनसोक्त तु गुजगोष्टी                     ॥३॥

चाल : मूळ गाण्याचीच.

  1. हे भाषांतर कोणत्या हिंदी चित्रपट गीताचे आहे हे ओळखा.
  2. भाषांतरातील चुका, उणिवा दाखवा व सुधारणा सुचवा.

पेपर सोपाच आहे. सोडवण्यासाठी शुभेच्छा.