आम्हाला कोरिया मध्ये येऊन बरेच दिवस झाले. गेले वयाचे २५ वर्षे आम्ही भारतात होतो. खूप आनंद होता त्या दिवसांमध्ये. आपले नातेवाईक, आपले सणवार साजरे करताना खूप आनंद व्हायचा. पण आपल्या देशावर आपलं किती प्रेम आहे, हा मात्र कधीच विषय नव्हता. आपण भारतात राहतो, नोकरी करतो, आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यामध्ये कधी वेळच नाही मिळाला देशाविषयी विचार करायला.
आपलं एक विशिष्ट वर्तुळ म्हणजे आपला देश असावा. पण आता कोरियाला आल्यापासून आपण आपल्या देशावर किती प्रेम करतो हे समजयला लागलं आहे. भारततल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टिची आता ओढ वाटते. भारतात जाताना विमानतळावर उतरल्यावर जमिनीला खाली वाकुन नमस्कार करावा वाटतो. शाळांमध्ये म्हटलेली देशभक्तिपर समुहगीतांचा नव्याने अर्थ उमगायला लागतो. त्यामधली आर्तता अधिकच जाणवते. इथेही सगळे भारतिय मिळून सगळे सणवार साजरे करतो. पण मनामध्ये मात्र सतत एक पोकळी असते. परदेशात राहून देखिल मनामध्ये आपला देश घेउन आम्ही फिरत असतो. आणि अश्या या देशाला माझे शतशः वंदन.
प्रजसत्ताक दिनाच्या निमित्त्याने, हेच सांगावेसे वाटते की देश काय आहे हे कळायचे असेल तर परदेशात एकदा जरुर जावे.
सौ. शितल विजय देशमुख.