माझं पहिलं प्रेम
मोहवी मला ती लावण्यवती
भासते जणू की मदनरती
सळसळे बनी ती नागीण जशी
हि नार असे हो 'बावनकशी'
प्रेमात तिच्या मी आकंठ बुडोनी
रूप तिचे साठवी लोचनी
हृदयी जागा तिला देऊनी
म्हणे तूची गं 'हृदयस्वामीनी'
कधी दिसे ती माऊली रूपी
लडीवाळ बरसते तान्हुल्या ओठी
म्हणे मला ती मारूनी मिठी
स्वर्गातूनी आले तुझिया भेटी
मीही मग गर्वाने फुलूनी
स्वर्गीय प्रेम ते तिला अर्पुनी
स्पर्शुनी तिजला ठेवी जपुनी
पहिले वहिले प्रेम जाणुनी
बसुनी असता सरितेकाठी
छाया पडती माझ्या पाठी
वळूनी पाहता येती शब्द ओठी
प्रेयसी तूच ती 'माय मराठी'......
'माय मराठी'.....!