तुला नव्यानं भेटायचं आहे...

खूप दिवसांनी तुला तसं नव्यानं भेटायचं आहे...

जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा द्यायचा आहे...

बस स्टॉपवर तुझी वाट बघत थांबायचं आहे

उशीर झाला तुला तर रुसवे फुगवे करायचे आहे,

खरंच..!  परत तुला तसं नव्यानं भेटायचं आहे...

जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा द्यायचा आहे...

कुठला ड्रेस घातला असशील... कुठली साडी नेसली असशील

असा विचार करत रमायचं आहे

खरंच..!   परत तुला तसं नव्यानं भेटायचं आहे...

जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा द्यायचा आहे...

छोट्याश्या हॉटेलात, एखाद्या कोपऱ्यात बसून

एकच कोल्ड्रिंक दोघात प्यायचं आहे

खरंच..!   परत तुला तसं नव्यानं भेटायचं आहे...

जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा द्यायचा आहे...

शांत रमणीय संध्याकाळी, हातात हात घालून

रस्त्यावरून भटकायचं आहे...

खरंच..!   परत तुला तसं नव्यानं भेटायचं आहे...

जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा द्यायचा आहे...

येशील का तू असं भेटायला...?

का म्हणशील काय हा वेडेपणा...

मनातली इच्छा मनातच राहू न देता

परत तुला तसं नव्यानं भेटायचं आहे...