वेगळेपण ते काय असणार...?

माझे असे निराळे... माझे असे वेगळे म्हणताना

माणूस हे विसरतो की

चौकटीत आयुष्य जगल्यावर वेगळेपण ते काय असणार..

माझी बायको अशी..

माझा नवरा असा..  

माझी  मुले अशी..

म्हणत स्वतःचं वेगळेपण जपताना

माणूस हे विसरतो की

चौकटीत आयुष्य जगल्यावर वेगळेपण ते काय असणार..

स्वतःचं दुःख कुरवाळत दुसऱ्या पेक्षा मीच दुःखी म्हणताना,

किंवा सुखी आयुष्य जगत सगळ्यांपेक्षा मीच सुखी म्हणताना

माणूस हे विसरतो की

चौकटीत आयुष्य जगल्यावर वेगळेपण ते काय असणार..