कांद्याचा पराठा !

  • कणीक, कांदे २, चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ, कोथिंबीर.
१५ मिनिटे
आवडीनी खाणार्यानसाठी

पोळीसाठी मळतो तशी कणिक मळुन घ्यायची.

सारणः
कांदे पातळ उभे चिरुन घ्या. त्यात तिखट, मिठ, कोथिंबीर घालुन थोड्या तेलात परतुन घ्यावे.
सारण गार झाले की पुरणाच्या पोळीत पुरण भरतो तसे भरावे. आणि लाटावे व नेहमीचे पराठे भाजतो तसे तेल टाकुन भाजावे.
कांदा पोळी लाटताना थोडा बाहेर येतो, तो येऊ द्यावा, तो तव्यावर भजला गेल्यामुळे मस्त स्वाद लागतो.
गरम गरम पराठ्यावर मस्त साजुक तुप घालुन फ़स्त करावा... आपण खुष .. कारण करायला सोप्पा आणि घरातले पण खुष..

प्राजक्त

नाहीत.

खवय्यांकडुन समजले