किती चतुर या बायका!

प्रख्यात लावणीकार राम जोशी हा उत्तर पेशवाईतील शाहिर. त्याने मराठीस अनेक लेणी दिली आहेत. येथे त्याचे अपन्हुती अलंकाराचे उदाहरण प्रस्तूत करत आहे. त्यातील अर्थ-फोड जमते का पहा!

"अंबरगत पयोधराते रगडूनी पळतो दुरी"

"कोण गे नंदाचा हरी?"

नव्हे ग, मारुत मेघोदरी"

किती चतुर या बायका,

रसिकहो, छेकापन्हुती आयका!