आनंदगीत गाता...

जेव्हा प्रभात काळी,

कमळास जाग आली,

प्रत्येक पाकळी ही,

दवबिंदूने नहाली!

वाटे कळी-कळीसी,

मज फूल रूप येई!

पाती तृणा-तृणांची,

सौख्यात नाचताती!

पक्षी मधुर गाती,

तोऱ्यात डोलताती!

ऐशा सुरम्य वेळी,

सुचती नावीन ओळी!

गाणे नवे हवेसे,

हर्षास साद देते!

आनंदगीत गाता,

पुलकित होई कांता!

कांतेसमेत गावे,

मोदास आळवावे!

आता प्रसन्नतेला,

सीमा कशास बोला!

दाही दिशा खुल्या या,

मज खूप खेळण्याला!

आनंदगीत गाता,

संतोष होई चित्ता!