सिंधूचे पाणी खारे

सिंधूचे पाणी खारे

सूर्यास्थाकडे डोळे, वाळूत उभे पाय,
अन बिलगणाऱ्या लाटांवर्ती,
पांढरी पांढरी साय.

आली शिंपले घेवून, लाट सागर किनारी,
झिजल्या अंगठ्यांचे तीर्थ,
पिवून परत जाणारी.

मोती शोधता शोधाता, पाय दुखावले झोंबले,
मोती वाहण्या आपुले,
शिंपले वाळूत थांबले.

थकून आता किनारी, पेलती दोन्ही वारे,
त्यांचे सुखदुख पिवून,
झाले सिंधूचे पाणी खारे.

- अनुबंध