वाघोबची आरती

ओवाळा ओवाळा माझ्या वाघोबा राया - माझ्या वाघोबा राया
काळे पिवळे पट्टे तुझी उजलती काया  ||धृ||

अनकुचिदार दात तुझी सिंह्गर्जना - तुझी सिंह्गर्जना
थर थर थर थर काया कापे करीतो अर्चना
जंगल सोडुनी गावामध्ये तुची अवतरला
सर्व जनांमध्ये थंडी ताप भरला
जंगलांची सत्ता तुझी अशीच राहू दे - देवा अशीच राहू दे
अमुच्या गांवी सुखाची झोप आम्हा घेउ दे ||१||

आतंकवादी घुसले देवा अपुल्या देशात - देवा अपुल्या देशात
गरिबांवरती खुप केले त्यांनी आघात
लपुनी बैसले आतंकवादी तुझ्या जंगलात - देवा तुझ्या जंगलात
समाचार घे तु त्याचा तुझ्या शैलीत ||२||

येता जाता उठता बसता तुझेच ध्यान रे - देवा तुझेच ध्यान रे
शुरपणाचे लक्षण तु विश्वची शान रे
तुझे भक्तगण आम्ही आलो नागझीरा - आम्ही आलो नागझीरा
दर्शनाची इच्छा आता पुर्ण करा 
ओवाळा ओवाळा माझ्या वाघोबा राया - माझ्या वाघोबा राया
काळे पिवळे पट्टे तुझी उजलती काया ||३||

ः- किशोर खेडुलकर (जंगलमित्र)