माझी जीवनाची नवीन सुरुवात

आयुष्य नवीन जगायच मला
जून आहे ते विसरायचे मला
विचारतात सगळे बदलतोस कशाला
कस सांगू डोळे साथ नाही देत रडायला
                   
                 आयुष्य......................

रडून- रडून डोळ्यांचे वाळ्वंट झाले
जिवनाचे जगंल हि ओसाड झाले
आता.... मरण्याचे हि सर्व प्रयत्न फसले
नशिब थोडे . म्हणून हे आता मला सुचले

                  आयुष्य......................

आयुष्य आता किती माझे राहिले
ना ते कोणी पाहिले
जिवनात माझ्य मला एक समझले
फक्त मि रडलो माझ्यवर सगळे हसले

               आयुष्य......................

हसायला आता मि सुद्धा तयार आहे
मन सावरले सर्व हिरवे रान आहे
आता मलाच माझा अभिमान आहे
नवीन आयुष्यात मला समाधान आहे
              आयुष्य......................

सर्वांसाठी जगून काय भेटत असत?
रोजच्या "मड्याला" तरी कोण रडत असत
प्रत्येक क्षणि जग बदलेले असत
आत आपण आपलच बघायचे असत
        
               आयुष्य.....................