मी हा असा...!

मी हा असा / निर्मलसा/

शरदातला चंद्र जसा/

मी हा असा / लखलखता /

तेजभारित / जणू कवडसा /

मी हा असा / झिजतो कसा /

गंधभरला / चंदनसा /

मी हा असा / सागरसा/

विशाल आणिक/ गंभीरसा /

मी हा असा / निर्झरसा /

मनमोकळा / खळखळता /

मी हा असा / तारा जसा /

अंधारातही / चमचमता /