( ही कविता - 2009 विश्व मराठी सहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत प्रकाशीत )
आला आषाढाचा मास, चार मास आता खास,
जाऊ देवाचीया गावा, विसराया सम्दा त्रास |
नाही चाकाचिये गाडी, नाही पुढे बैल जोडी,
वारकरी पाऊल वेडी, संगे अभंगाची गोडी |
जाती एका मागून एक, मैलामैलाचे दगड,
सैल पडती आपुली, संचिताची ही पकड |
कुणा करी दंग मृदंग, कुणाहाती रंगे टाळ,
त्यांच्या अवघ्या नादाने, थरथर कापतोया काळ |
डोंगरावर मोठे अंगण, त्यावर धरले रिंगण,
बेफाम अश्व धावती, हरपूनिया सर्व भान |
आली आली एकादशी, दिसला विठुचा कळस,
माझा एथुनच दंडवत, खाली ठेवुनिया तुळस |
- अनुबंध