पत्र... भाउसाहेब पाटणकर

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली

धाडली होती अशी की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे

सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे!