स्नेह ज्योत प्रकटते,
मन्मनी प्रकाशते!
सतत वात तेवते,
मनामना सांधते!
ज्ञान-साधना इथे,
नित्य नवी चालते!
जनहितास साधणे,
हेच ध्येय सांगते!
"कमी जिथे, मी तिथे, "
घोषवाक्य बिंबले!
श्रमात ना खंड रे,
श्रम-महात्म्य मान्य ते !
सकल लोक, एक हृदय,
मंत्र दिव्य, कार्य भव्य !
संघ-शक्ती हेच सत्य,
प्रेमभाव हेच पथ्य!