|
सांगायचे खुप काही आहे
पण ऐकत कोनी I नाही
म्हणून लिहायला बसले
तर शब्दच सुचत नाही
काय करू काय नको
काही कळतच नाही
तो माझ्यासाठी सर्वकाही
आणि.... मी त्याच्यासाठी काहीच नाही
फ़ोन करू का, की केव्हा
येइल त्याचा फ़ोन? वाट मी
पाहते आहे
आणि... त्याला मात्र कशाशी
देण घेण नाही कारण म्हणे
ही.. फक्त मैत्री आहे
एकमेकांच्या सुखा दुखामध्ये
सहभागी होणे
हेच माझ्यामते मैत्रीचे सूत्र आहे
आता तूच बघ यासाठी मी किती पात्र आहे
आणि.... तू माझा मित्र आहेस?
|