पोन्गल

  • २ वाट्या तान्दुळ
  • ३/४ वाटी मुगाची दाळ
  • थोडे काळे मिरे
  • कढीपत्ता
  • फोडणीसाठी तुप
  • जीरे
  • चवीनुसार मीठ
  • हिन्ग
  • आले किसलेले
  • उडीद दाळ
१० मिनिटे
४ जण
  1. तांदूळ धुऊन भिजत घालावेत(पाच मिनिटांकरिता).
  2. मुगाची डाळ, तांदूळ, आणि चवीनुसार मीठ कुकरामध्ये शिजवावेत(मुगाच्या खिचडीसारखे पण हळद घालू नये. )
  3. एका कढईत फोडणीकरिता तूप घालावे.
  4. त्यात जिरे, थोडीशी उडीद डाळ,हिंग, कढीपत्ता, काळे मिरे, किसलेले आले हव्या असल्यास लाल मिरच्या घालाव्यात. 
  5. ही फोडणी शिजलेल्या भातावर घालावी.
  6. चांगले मिक्स करून, गरम सांबार किंवा चटणीसोबत वाढावे.

पोंगल दोन प्रकारचे असतात.
गोड आणि तिखट.
गोड पोंगल करताना तांदुळ आणि मुग शिजवताना गुळ टाकतात (पण मी अजून करून बघितलेला नाही.)


सासुबाई