मी(ही) लिहिलेले उखाणे - २

प्रेरणास्रोत : इथे  व इथे वाचा.

१३)शाहरुख व करणची प्रसिद्ध आहे जोडी
...रावांना नसो बाई तसली काही गोडी

१४)महाभारतात एकलव्याची आहे गाथा
जागे व्हा ...राव नाहीतर अनुसरेन मी नियोगाची प्रथा

१५)कोल्हापूरची मिरची आहे झणझणीत
रात्री खाल्ली ...रावांनी, सकाळी आले अडचणीत

१६)कमळाभोवती भ्रमराचे गुंजन
...राव तरी कुठे आहेत सज्जन ?

१७)आम्रतरूवर कोकिळेचे गुंजन
मी स्वर सुरेल, ...राव कठोर व्यंजन

१८)राधा होती हरिभजनात तल्लीन
...राव म्हणतात, "दो या तीन?"

१९)कृष्णाने केले कालियामर्दन
...राव आहेत घरात कर्झन

२०)सर्व क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा उमटवलाय ठसा
...रावांच्या गालावर मी पंजाबचा जसा

२१)गणेशाला प्रिय दूर्वांची जुडी
...रावांना प्रिय डिसुझांची जुडी

२२)संत जनाबाईने दळिता कांडिता विठ्ठलाला आळविले
...रावांच्या वरणात मी शिलाजीत कालविले

२३)श्रावणात दिसते आकाशात इंद्रधनुष्य...
..राव विश्वामित्राचे शिष्य, मी मेनका - इश्श!

२४)हिरडा, आवळा, बेहेडा याची असते आयुर्वेदात भरती
...रावांच्या झाले मी जनानखान्यात गर्ती