सांजवेळी दाटते काहूर तेव्हा , रात्रही सळते सले एकांत जेव्हा,
वाटते जावे रमावे दूर कोठे, आग ही शमवील असला स्पर्श व्हावा,
आपल्या जे राहती श्वासात जागे, जिवलगांचा मोगरा त्या दरवळावा,
आपले सारे इरादे नेक तरीही, सावलीला सन्शयाचा वास यावा?
नेमके पळती कसे हे पाठीराखे,एकट्याने क्रुस कुठ्वर वागवावा,
अजुनी का वाटे भरोसा अक्शरांचा, शब्द जर जगण्यास देतो हेलकावा,
एकटा मी सोबती एकांत माझा, जिवलगानी ध्यास माझा का धरावा
वेचताना आठ्वांचे क्शण सुखाचे, दुक्ख म्हणते तू मला आधार द्यावा,
अक्शरे मी रेखिली काही नभावर, तारकानी त्याच का धरला दुरावा
दोश माझा काय मी मित्रात रमतो, साथ देणारा कुणीही का नसावा.