पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे दिनांक २१ एप्रिल ते २० मे दरम्यान वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सर्व व्याख्याने रोज सायंकाळी ६. ३० ते ७. ३० या वेळेत होणार आहेत.
साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान इ. अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण व्याख्यान देण्यास आपण उत्सुक असाल अथवा असे व्याख्याते आपणांस माहित असतील तर कृपया ३१ मार्च पर्यंत आपला किंवा व्याख्यात्याचा संक्षिप्त परिचय, संपर्काचा पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, यापूर्वी व्याख्यान दिले असल्यास त्याची माहिती यासह दुवा क्र. १ किंवा दुवा क्र. २ येथे अथवा 90110 83127 ह्या क्रमांकावर किंवा येथेच व्यक्तिगत निरोपाद्वारेही संपर्क साधावा.
धन्यवाद!
निखिल गाडगीळ