अशक्य केवळ - २

आमची प्रेरणा :- जयशी अंबासकर यांची कविता अशक्य केबळ

कशास वावर मनात केवळ ?
भ्रतार असला अशक्य केवळ

नको अता तुज वरणभात मी
हवी काकडी खमंग केवळ

तुझ्यामुळे ही सुषुप्त गात्रे
सदा घोरणे तुझेच केवळ

जरा तरी तुज हुक्की यावी
कसे करावे उपास केवळ

हवी नव्याने सख्या उभारी
किती कराव्या खोड्या केवळ ?