अशक्य केवळ-३

आमची प्रेरणा :- जयश्री अंबासकर यांची कविता अशक्य केबळ

तुला मोजणे मणात केवळ
किलोत आता अशक्य केवळ

तुझी पाहता  फुगीर गात्रे
तुला तुमानी अशक्य केवळ

नको तंग ही उगाच वसने
बसता होइल  दुभंग
 केवळ

पुन्हा कसे मी बारिक होऊ
रोज पळावे जिमेत केवळ

करा "केशवा" पुन्हा तयारी
लक्ष असु दे  हे शेप केवळ

केशवसुमार