पसारा

आमची प्रेरणा पुलस्ती यांची सुंदर रचना शहारा

किती पाळणे  हलून गेले
अता थांबबा... थकून गेले

रंगामध्ये आले मी अन-
कुठे अचानक उठून गेले?

घरात डोकावले; दचकले
कुणी कडे मी चुकून गेले!

अजून खाटेवरी पसारा
कुणी इथे बागडून गेले

जमेलसे वाटलेच नव्हते
हळूहळू मग जमून गेले...

काल मला ती काय म्हणाली?
"काम तुझ्यावीन घडून गेले"

सदऱ्याला का गंध निराळा
कोण पाखरू बसून गेले?

पती जरासा  सुंभ निघाला
लग्ना दिवशी पळून गेले!

श्वासांची येरझार "केश्या"-
खरे काय ते कळून गेले?