पालक भजी.

  • पालकाची तिस पाने(शक्यतो मोठी पाने)
  • तळण्यासाठी तेल.
  • एक मोठी वाटी डाळीचे पीठ
  • दोन चमचे तांदळाचे पीठ
  • एक चमचा मैदा(ऐच्छिक)
  • दोन चमचे तिखट, दोन चमचे ओवा, एक चमचा हिंग,एक चमचा हळद
  • चवीपुरते मीठ.
३० मिनिटे
तीन माणसांकरीता.

पालकाची पाने धुऊन घ्यावीत. एका पसरट भांड्यात डाळीचे, तांदुळाचे पीठ व मैदा घेऊन त्यात हळद, हिंग, तिखट, मीठ व ओवा घालावे. थोडे थोडे पाणी घालून एकजीव करावे. सगळ्या गुठळ्या मोडाव्यात. भजीचे पीठ  तयार करायचे असल्याने पाणी बेतानेच घालावे. थोडावेळ ठेवावे. ( हे पीठ दोन तास आधी तयार करून ठेवले तर छान मुरते, भजी घालायला घेताना चमच्याने चांगले फेसावे. हलके होते. ) कढईत तेल तापत ठेवावे. प्रथमच तेल चांगले तापू द्यावे. तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवावा. आता एक पान घेऊन पिठात बुडवून तळावे. एकावेळी तीन पानांपेक्षा जास्त पाने कढईत टाकू नयेत. ( ही पाने नाजूक असतात, भजी पटकन जळू शकते. ) गरम गरम खावीत.

 

पालकाची भजी अतिशय कुरकुरीत लागतात. बऱ्याचदा लग्नाच्या जेवणामध्ये केली जातात.