इंद्रधनुष्य

मन वेडपिसाट निर्झर
दुर्दम्याची वाजे सतार
दुर्बोध होई धुळाक्षर
     बालपणीचे

मैत्र दोन मनांचे
टिपूर चांदणे पौर्णिमेचे
इंद्रधनुष्य स्वप्नांचे
     सप्तरंगी

लक्ष दिशा उगवत्या
लक्ष पणत्या उजळत्या
लक्ष लक्ष मनवत्या
     क्षणोक्षणी

भविष्याचे अबोल कोडे
स्थळकाळाचे पडले वेढे
मन मात्र वेडे वेडे
     निराधार

पाऊस येईल घेऊन
साताजन्माची ही खूण
आहे तितके पुण्य राखून
     शुभंकर…