मावशी- प्रेरणादायी प्रवास

          भारताच्या इतिहासात स्त्रियांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. पत्नी, माता, बहीण अशा विविध नात्याच्या रूपात मायेचा आधार देणाऱ्या व प्रसंगी कठोर होऊन अन्यायाच्या निर्मूलनासाठी रणचंडिकेचे रूप धारण करणाऱ्या स्त्री ची थोरवी महान आहे.  जीजामाता, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आणि अशीच इतर कित्येक नावे भारतीय इतिहासात अमर आहेत. काहींची जीवनगाथा तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे तर काहीच्या त्यागाला, त्याच्या कार्याला उजाळा देण्याची गरज आहे. अश्याच एका स्त्रीच्या, मावशी केळकरांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकणारी ही लेखमालिका मनोगतींनी उत्साहाने पूर्ण केली आहे. मावशींच्या जन्मशताब्दीच्या निमित्त्याने त्यांना मनोगतींनी वाहिलेली ही आदरांजली. ह्या विषयावर इंग्रजीतून माहिती येथे आहे .त्याचाच मराठीत भावानुवाद मनोगताच्या काही सदस्यांनी केला आहे.


                एका सामान्य कुटुंबात शंभर वर्षापूर्वी जम्नाला येऊन स्वतःच्या दुर्दम्य आत्मविश्वास, साहस, चिकाटी, जिद्द, कष्ट, राष्ट्रभक्ती आणि नेतृत्व गुणांमुळे महिलांची जगातील सर्वात आगळीवेगळी शिस्तबद्ध व शक्तिमान संघटना उभारण्याचे दिव्यकार्य पार पाडून मावशींनी फक्त भारतीय स्त्रीवरच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजावरच खूप उपकार केले आहेत. मावशींच्या जीवनाचा परिचय मनोगतींना करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.