गालावरुन ओघळणारा
एक अश्रु म्हणाला
माझा जन्म कशासाठी
फ़क्त गालावरुन गळण्यासाठी
कि रुमालात सामावण्यासाठी
जेव्हां दु:खात मी भेटतो
तेंव्हा लोक नशिबाला दोष देतात
मी कोणाकडे दाद माग़ावी
जेंव्हा माझ्या जन्माचे कारणच दु:ख होते
मग मी अश्रुस म्हणालो
अरे तुझ्यामुळेच तर
जीवनाला अर्थ आहे
माझ्यासाठी कोणाच्या डोळ्यात
तु भरुन आला नाही
तर जीवन माझे व्यर्थ आहे
मग अश्रु गालातच हसला
आणि म्हणाला
दु:खातच नाही गड्या
आनंदातही तुला भेटणार
आयुष्यभर तुझ्या सोबतिला येणार
आणी काळ रत्रि नंतरही
आनेकांच्या डोळ्यातुन
तुझ्यासाठी वाहणार