सख्‍या...

हास्य जरी ओठात माझ्या,
हास्य ते ना अंतरी,
जाणिशी ना तू मनीं?...

रंग तू काही दिले,
रंग मी माझे दिले,
परी चित्र ना ते रंगले...

दीप प्रीतीचे सख्या रे,
कापरासम क्षणिक जळले,
काही न मागे राहिले...

वाट स्वप्नांची सुगंधी,
गर्द हिरवी, मखमली,
अन्, उमलली प्रीतीफुले...

चालू जाता मी सुखाने,
हाय, हिरवाळीतुनी,
किती डंख पायी लागले...

यातनांनी पोळलेल्या,
पावलांना नि मनाला,
प्रेम कधी ना लाभले....