प्रीत

तुझी माझी प्रीत
एक अबोल गीत
ना सुरांचे बंधन
ना शब्दांची रीत

तुझी माझी प्रीत
केवळ नयनांची भाषा
तुझी चोरटी नजर
माझा चंचल इशारा

तुझी माझी प्रीत
न केवळ जन्माचं नातं
जाणीवेच्या क्षितिजावरील
दोन आत्म्यांचं मिलन