ती धुंद यामिनी

स्वर्ग उतरुनी आला
आज माझ्या अंगणी
न्हाउन निघाली रात्र
त्या चंचल शशि किरणांनी

अशा या स्वर्गीय आनंदात
मी आणि माझी राणी
मंत्र मुघ्द प्रतेक क्षण
आणि अबोल प्रीती नयनी

तो गोड रुसवा लटका राग
नाद केवळ तिच्या कंकणी
वेड लावी मनाला
ती धुंद यामिनी