शक्तिहीन

कधी कुणी छाया देते स्वार्थ जागवाया ।
मने गेली सुकुनी अवघा अश्रु ओघळाया ॥

शब्द दान केले ज्यांनी खंत का जिवाला ?
आसवांचे पूर येता अर्थही बुडाला
एक श्वास दीपस्तंभा लावी गांगराया ॥

देहभान पोचू पाहे उंच भास्कराला
म्लान होत गात्रे जाई चंद्रही तळाला
रात्र झाली शक्तीहीन लाज पांघराया ॥