तू फक्त जवळ असावीस .....
गणेशाच्या गाभाऱ्यात , सारा हिशेब जुळवताना
डोळे मिटून शांतपणे त्याला , सारं काही कळवताना,
समईच्या सन्धिप्रकाशात , भावनांना उधाण येताना...
तू फक्त जवळ असावीस.....
मखमली स्वप्नांच्या बेधुंद आकाशात ,
फुलणाऱ्या फुलात फिरणाऱ्या फुलपाखरात ,
त्या मंद धुक्यात दरवळणारा तो सुगंध ,अंगावर रोमांच चढवताना ,
तू फक्त जवळ असावीस.....
....... अभिजित चंद्रशेखर