आयुष्याचं रडगाणं गायच नाही
हे ठरवलंय मी आता.
पुन्हा नव्याने सुरवात करायची;
हे समजतंय मला.
आयुष्याचा क्षण अन् क्षण;
आनंदात जगायचंय मला;
भिरभिरणाऱ्या फुलपाखरांसारखं;
आयुष्यात बागडायचंय मला.
मला माहीत आहे फुलपाखरू;
अल्पायुषी असतं.
पण तरीही तेसुद्धा आयुष्य;
मधाच बोट चाखत जगतं.
मीच कशाला करायची भविष्याची काळजी;
अन् भूतकाळाचा विचार.
आयुष्य जगताना येतील;
असे भूतभविष्य हजार.
दीपस्तंभासारखं राहायचंय;
मला माझ्याच आयुष्यात;
माझं स्वत्व शोधायचंय मला;
माझ्या आत्म्याच्या गाभाऱ्यात.