जोडीदारा, जोडीदारा/ तुझी साथ सदा मला /
जीवनाच्या या गतीला / नित्य तूच संगतीला/
आयूष्याच्या वाटेवरती / सुख-दुःखांचे हिंदोळे /
तुझे माझे मन डुले / मस्त मौजेचे झुले /
कधी उंच गगनात / ध्वजा माझी फडकते /
पाठी घोष जयकाराचे / गुंज मनी बहरते /
कधी काळी अकस्मात / बळ पायीचे सरते /
तेव्हा घालून फुंकर / मंत्र काही पुटपुटे /
माझे निर्णय कठोर / तुझ्या मनावर वार /
मीच निर्दय आणि क्रूर / तू मात्र निर्विकार /
ऐल कधीच सुटले / पैल वाट दुरातली /
अजून वल्हतोची धार / साथ तूझी प्रेमातली /