अनाकलनीय - ५

अनाकलनीय - ५


 


आल्या-गेल्या क्षणांना आपणच आपलं म्हणायचं,


दुःखाला वळसा घालून पुढे चालत रहायचं..


नशिबाला दोष देत पुढे सरकत राहायचं ...


आणी ह्यालाच हसत-हसत जगणं म्हणायचं..


 


तुम्हीच सांगा, मनाला समजावंत जगायचं कसं ?


आता हसायला तरी, उसनं अवसाण आणायचं कसं ?


 


वाट चालायला जावं तर


रात्र अंगावर चालून येते..


सुख पहायला जावं तर


वाट अंधारात हरवून बसते..


 


तुम्हीच सांगा,


असं चाचपड्त तरी, कुठ्वर चालायचं असं ?


वाटेला दिशा समजत अंधारायचं कसं ?


आणी ह्यालाच हसत-हसत जगणं म्हणायचं तरी कसं?


 


कष्ट करायला जावं,


तर इष्ट काही घड्त नाही..


शांत पडून रहावं,


तर विचार सोड्वत नाही..


 


तुम्हीच सांगा,


असं  कण्हत कण्हत, तरी नीजायचं कसं ?


पावसाची वाट बघत, रोज तरी जागायचं कसं ?


 


आल्या-गेल्या क्षणांना आपलं म्हणायचं


दुःखाला वळसा घालून पुढे चालत रहायचं


नशिबाला दोष देत पुढे सरकत राहायचं


आणी,


ह्यालाच हसत-हसत जगणं म्हणायचं


 


तुम्हीच सांगा, मनाला समजावंत जगायचं कसं ?


आणी हसायला तरी, उसनं अवसाण आणायचं कसं ?


 


माधव कुलकर्णी (संपाद्क)