पालक कुट्टू रूपांतरित

  • १ जुडी पालक धुवून व बारीक चिरून
  • १ टोमॅटो बारीक चिरून
  • १ कांदा चिरून
  • फोडणीसाठी तेल, मोहरी व ऊडीद डाळ, कढीपत्ता
  • चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट
  • पाव चमचा हळद
  • १ टी स्पून लोणी
  • सांबार मसाला चवीप्रमाणे(मूळ कृतीत कुलंबू पावडर घालतात)
  • १/२ वाटी तूरडाळ अर्धा तास भिजवून निथळून
२० मिनिटे
अंदाजे ३-४ जणांसाठी

तूरडाळ कुकरमध्ये पाणी, हळद व थेंबभर तेल घालून तीन शिट्ट्या काढून मऊ शिजवून घ्यावी. ह्या शिजलेल्या डाळीत चिरलेला कांदा, पालक, टोमॅटो, मीठ, साखर, लाल तिखट, सांबार मसाला व पुरेसे पाणी घालून ते मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे व पुन्हा कुकरमध्ये २ शिट्ट्या काढाव्यात. एका कढल्यामध्ये तेल तापवून त्यात मोहरी घालून ती चांगली तडतडल्यावर ऊडीद डाळ, कढीपत्ता घालून ती फोडणी ह्या शिजलेल्या कुट्टूवर घालावी. सर्वात शेवटी त्यांत स्वादासाठी लोणी घालून गरमागरम पोळी वा भाताबरोबर खावे.

सांबार मसाल्याएवजी गरम मसाला वापरला तर अजून झणझणीत चव येईल.

मैत्रीण